सार्वजनिक बांधकाम विभागातील तीनशे कोटीची कामे वादातीत ; सर्व नियम डावलून हॉटमिक्स प्लांटला अधिकाऱ्यांचे पाठबळ
रितेश पुरोहित
मो.नं.९४२३७०३८३१
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत होत असलेल्या तीनशे कोटी रुपयाच्या कामाची तक्रार विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांनी राज्याचे अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे त्यांच्या मुद्दे निहाय तक्रारी मुळे तीनशे कोटी रुपयाची कामे वादातीत सापडली आहे. विकास कामाच्या नावाखाली शासकीय तिजोरी लुटण्याचा अधिकाऱ्यांचा डाव खासदार धानोरकर यांच्या तक्रारीमुळे तूर्तास उधळलेला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील वजनदार पुढाऱ्यांनी तीनशे कोटी रुपयाची कामे विशिष्ट ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगले वेठीला धरलेले आहे अशा अधिकाऱ्यांनी निविदेमध्ये असलेले नियम मनमानी पद्धतीने शिथिल करून कंत्राटदार कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने बनावट अहवाल तयार केले आहे .
खैरी मार्डी नांदेपेरा रस्ता रामा क्रमांक 317 किलोमीटर 150/00 172/100 ची सुधारणा करणे सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वनी कायर पुरड रस्ता रामा क्रमांक 319 किलोमीटर 0/00 ते 23 /500 ची सुधारणा करणे सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत घाटंजी ते पारवा रस्ता रामा क्रमांक 267 रस्त्याची सुधारणा करणे सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ पारवा ते पिंपळखुटी रस्ता रामा क्रमांक 315 या रस्त्याची सुधारणा करणे सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ या रस्त्याचा तीनशे कोटी रुपयाच्या कामांमध्ये समावेश आहे.
हॉट मिक्स करिताची यंत्रसामग्री आवश्यक असताना त्याबाबत अटीनुसार कंत्राटदारास वर्कऑर्डर नंतर कामाचे नाव क्रमांक एक व दोन करिता तीस दिवस आणि तीन व चार करिता साठ दिवसाच्या आत मॉडर्न बॅच टाईप हॉट मिक्स प्लांट स्थापित करून ट्रायल रन देणे व ट्रायल रन देत असताना टेम्परेचर डाटा डायरेक्ट पीडब्ल्यूडी सर्वर पाठविणे बंधनकारक होते. ट्रायल रन देण्यास कंत्राटदार अपयशी झाल्यास कंत्राटदाराला त्याबाबत मुदतवाढ न देता पूर्वसूचना न देता कंत्राटदारांनी भरलेली रक्कम तसेच कामावरील अन्य सुरक्षा रक्कम शासन जमा करून कंत्राटदारा सोबत झालेला करारनामा रद्द करण्याची अट निविदेमध्ये हे नमूद केलेली आहे.
वरील कोणत्याही कामाचा निविदेतील अटीनुसार ट्रायल रन झालेला नाही आज जवळपास वर्कऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु अद्यापही कोणत्याही कंत्राटदाराने साठ किलोमीटरच्या आत बॅच मिक्स प्लांट स्विफ्ट केलेला नाही तरी संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदारावर कार्यवाही करणे आवश्यक होते पण अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही निविदेतील दिलेल्या अटी व शर्तीनुसार कंत्राटदाराने भरलेली सुरक्षा रक्कम तसेच कामावरील अन्य सुरक्षा रक्कम शासन जमा करून कंत्राटदारास सोबत झालेला करारनामा रद्द करण्यात यावा अशी मुख्य मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी शासनाकडे केली आहे.
वरील संबंधित कामाच्या तक्रारी या विभागाचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी जशाच्या तशाच मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना दाखल केले आहे तीनशे कोटी रुपयाच्या कामामध्ये अधिकाऱ्यांनी प्रचंड गोंधळ घालून ठेवला आहे नियमानुसार हॉट मिक्स प्लान्ट साठ किलोमीटरच्या अंतरात असणे आवश्यक असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंट्रक्शन कंपनीला झुकते माप देण्यासाठी लांबीचे अहवाल मॅनेज केलेली दिसून येत आहेत. तीनशे कोटीच्या कामाच्या निविदा संशयास्पद रित्या ओपन करण्यात आल्याची तक्रार यापूर्वीच अंकित बोहरा यांनी केली होती यांच्या तक्रारीनंतर खासदार आमदार यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे.
वरील कामाचे कार्यारंभ आदेश दिल्याच्या तारखेपासून 31 मार्च 2020 पर्यंत किती लक्ष रुपयाची कमी झाले कार्यारंभ आदेशाची प्रत व 31 मेपर्यंत जे देयक देण्यात आले त्याचा तपशील निविदेत असलेल्या अटीनुसार कंत्राटदाराला कार्यारंभ आदेशानंतर 60 दिवसाच्या आत बॅच मिक्स प्लांट ची ट्रायल रन देणे बंधनकारक आहे आणि ट्रायल देत असताना निविदेतील असलेल्या अटी प्रमाणे टेंपरेचर डाटा पीडब्ल्यूडी यांच्या सर्वरवर पाठवणे बंधनकारक आहे ही अट कंत्राटदाराने पूर्ण केली का त्याबाबतचा स्कोडा डाटा, कंत्राटदाराने साठ किलोमीटरच्या अंतरात बॅच मिक्स प्लांट स्थापित केला आहे का 60 दिवसाच्या आत कंत्राटदाराने ट्रायल रन दिला असल्यास ही संपूर्ण कार्यवाही त्याचे फोटो व्हिडिओ निवेदिता अटींनुसार 60 दिवसाच्या आत कंत्राटदारांनी बॅच मिक्स प्लांट ट्रायल रन देण्यामध्ये कसूर केला असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणती कार्यवाही केली त्याचा अहवाल अशा इतर महत्त्वाच्या विषयावर आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांना अहवालाची मागणी केली आहे.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत खैरी मार्डी नांदेपेरा रस्ता रामा क्रमांक 317 बावीस किलोमीटर लांबी ची सुधारणा करणे निविदा क्रमांक 82 863 कार्यारंभ आदेश 25 जुलै 2019 वरील कामाचे कार्यारंभ आदेश कंत्राटदार मे ए सी पी एल आणि जे ओ सी पी एल यांना देण्यात आले निविदा अटी नुसार सदर कामाकरिता मॉडर्न बॅच मिक्स टाईप हॉट मिक्स प्लांट ऑफ मिनिमम एटी वन ट्वेंटी टी पी एच कॅपॅसिटी इक्विप विथ कंपोज राईट स्कोडा एग्रीमेंट ही हॉट मिक्स करिता ची यंत्र सामग्री आवश्यक आहे त्या अटीनुसार कंत्राटदारास आदेशानंतर 30 दिवसाचे आत मॉडर्न बॅच मिक्स टाईप हॉट मिक्स प्लांट कामाचे स्थळापासून शेवटच्या टोकापर्यंत साठ किमीच्या आत स्थापित करून त्याची ट्रायल देणे बंधनकारक आहे ट्रायल देण्यामध्ये कंत्राटदार अपयशी ठरल्यास त्याची पूर्ण अनामत रक्कम जप्त करून कंत्राट रद्द करण्याची अट निविदेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. नियमानुसार कंत्राटदाराने कोणतेही काम केले नाही सबब निविदा अटीनुसार कार्यवाही करण्याची मागणी अंकित बोहरा यांनी 11मे 20 20 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांना केली होती.
300 कोटी रुपयाचे काम विशिष्ट कंत्राटदाराला मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी पुढे सरसावले आहे त्याकरिता त्यांनी सर्व नियम डावलून शासनाची तिजोरी लुटण्याचा डाव आखला आहे विकास कामाच्या नावाखाली निविदा प्रक्रियेमध्ये नमूद असलेल्या नियमानुसार कामाला मंजुरात द्यावी अशी मागणी खासदार आमदार यांनी केली आहे कामांमध्ये दर्जा नसल्यामुळे जनतेची ओरड सुरू आहे.