अपने तो अपने होते है। पंकजांचा धनंजयला फोन, म्हणाल्या लवकर बरा हो.
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व मतभेद बाजूला सारत आपल्या भावाल फोन केला, तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
‘प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा’, असं पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना फोनवर म्हणाल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः दिली आहे.याशिवाय ते 8 ते 10 दिवसात कोरोनावर मात करतील, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देण्यात आली.