“एक घाव दोन तुकडे होऊन जाऊ दे” ; शिंदे गटांच्या नेत्यांचा भाजपाला थेट इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरु असलेली खदखद आता थेट समोर येऊ लागली आहे. ‘शिवसेनेच्याच जागेवर कशासाठी गोंधळ केला जातोय, भाजप आमच्याच जागेवर का हट्ट करत आहेत.
त्यामुळे एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे असा थेट इशारा शिंदेसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद टोकाला पोहचला असल्याचे दिसून येत आहे.
अर्जुन खोतकर म्हणाले की, “भाजपला 20 जागा जाहीर करण्याचा जसा अधिकार आहे, तसाच आमच्या 18 जागा जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार होताच ना?, आम्ही चौकट ओलांडली नाही, पण त्यांनी उमेदवार जाहीर केले आणि आम्हाला ताटकळत ठेवलं. परभणी, संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, वाशिम आमचं आहे. मात्र, या जागेबाबत रिपोर्टचा आधार घेऊन तुम्ही माघात असाल तर हे न्यायसंगत नाही, असे खोतकर म्हणाले.
‘एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे’
नाशिकच्या जागेवर देखील आमचा विद्यमान खासदार आहे. मात्र, तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार किंवा भाजपचा उमेदवार पुढे केला जातोय. माझ्यामते एक घाव दोन तुकडे व्हायला पाहिजेत. आमच्या जागेवरच का हट्ट? तुमच्या जागा आम्ही मागितल्या का? असा सवाल देखील खोतकर यांनी विचारला…

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….