अनुप धोत्रेंना मिळणार तगडी फाईट…! ; प्रकाश आंबेडकरांची निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना २७ तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आम्ही चार जागांवर ठाम आहोत.महाविकास आघाडीत काही मतदारसंघात मतभेद दिसून येत आहेत.
काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंरतु ज्या मतभेदाच्या जागा आहेत ते जाहीर केलेले नाहीत. त्याच्यामध्ये काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. तर शिवसेनेने त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. ते चित्र स्पष्ट झालं की ते आमच्यासोबत चर्चा करायला तयार असतील तर आम्ही देखील त्यांच्यासोबत बसायला तयार आहे, असंही पुढे आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. त्यांचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे त्यांच्या याद्या जाहीर होत नाहीयेत. मी त्यांनी दिलेल्या ४ जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मी माझ्या पक्षाच्या वतीने २७ मार्चला माझा अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, तर २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू असंही पुढे ते म्हणाले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..