नव्या चेहऱ्यांना लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून संधी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी रात्री उशिरा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील चार जागा आहेत. यापूर्वीच्या सात जागा, अशा एकूण ११ जागा जाहीर केल्या.
कोल्हापूर, रामटेक, अमरावती, सोलापूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर करत भाजपवर आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीत सात पैकी चार; तर दुसऱ्या यादीत चार पैकी दोन आरक्षित असलेल्या जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले. कोल्हापूर येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, नंदुरबार येथे ॲड. गोवाल पाडवी, लातूर येथे डॉ. शिवाजीराव काळगे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडाराऱ्यातून डॉ. प्रशांत पडोळे अशा चेहऱ्यांना पहिल्यांदा लोकसभला संधी दिली आहे.
नागपूरमधून विकास ठाकरे, अमरावतीतून बळवंत वानखेडे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, तर पुण्यातून रवींद्र धंगेकर या विद्यमान आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. गडचिरोलीतून डॉ. नामदेव किरसान आणि नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांना संधी दिली आहे. नागपुरात ठाकरे यांच्या रूपाने स्थानिक पातळीवर काम करणारा ओबीसी उमेदवार दिल्याने ‘गडकरी-ठाकरे’ अशी जोरदार फाइट होणार आहे.
दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात आली आणि काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांतील पराभव विसरून नव्याने कामाला लागण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळाली.
काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, नितीन राऊत अशा ज्येष्ठांबरोबरच सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे अशी तरुण नेत्यांची फौज काँग्रेसकडे आहे. मात्र शीर्षस्थ नेत्यांतील मतभेद आणि संघटनात्मक पातळीवरील विस्कळितपणा यावर मात करून वाट काढली तर निश्चितपणे काँग्रेसची स्थिती सुधारू शकेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..