खळबळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी ; त्या सराफा व्यवसायिकाचा दुदैवी मृत्यू ;
महागाव शहरातील काही परिसर प्रतिबंधित सिल होऊ शकतो ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
काल रात्री उशिरा कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या महागाव तालुक्यातील साधुनगर येथील सराफा व्यवसायिकाचा रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सराफा व्यवसायिक कोरोनाबाधित मृत्यूचा तिसरा बळी ठरल्याने महागाव तालुक्यातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मृतकाच्या संपर्कातील आलेल्या संशयित १३ रुग्णांना कालच आरोग्य यंत्रणेने संस्थात्मक विलगिकरण (कोविड केअर सेंटर) मध्ये दाखल केले आले.त्यांचा तपशील जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.मृतकाचे गाव महसूल आरोग्य आणि पोलीस यंत्रणेने कालच सिल करून गावात आशा सेविकेच्या माध्यमातून मोबाईल व्ह्यान द्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे . गावातील काही नागरिकांना लक्षणे आढळून येतात का याचीही खबरदारी घेतली जात आहे.
सदर सराफा व्यावसायिकाचे महागाव येथे प्रतिष्ठान आहे.त्यामुळे तो अनेकांच्या संपर्कात आला होता.हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील १३ जणांना संशयित म्हणून कोविड केअर सेंटर ला दाखल करण्यात आले आहे. त्यातील मृतकाच्या संपर्कात आलेल्या एका सराफा कारागिराला काही लक्षणे आढळून येत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे कोरोना चा महागाव शहरात प्रवेश होण्याची दाट शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
आज पाठवले जाऊ शकते संशयिताचे स्वॅब :
काल मृत्यू झालेल्या सराफा व्यवसायिकाच्या संपर्कातील आलेल्या आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील 13 संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांचे स्वॅब घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून महागाव आरोग्य यंत्रणेला आदेश प्राप्त होऊ शकते त्यानुसार त्यांचे व्याप घेऊन तपासणीसाठी आज पाठवले जाऊ शकते अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.