महागाव तालुक्यातील साधू नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात खळबळ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील रुग्णांची यादी तयार रात्री दोनच्या सुमारास आला रिपोर्ट पॉझिटिव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याला ब्रेक लागला होता. मात्र दोन दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणचे रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागल्याने जिल्हा हादरला आहे. नुकत्याच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्याची धग आता महागाव तालुक्यात सुद्धा पोहोचली आहे. मध्यरात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील मुडाणा परिसरात असलेल्या साधूनगर येथील एका सुवर्णकाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महागाव सराफा लाईन ची पाहणी करताना महसूल व आरोग्य यंत्रणा
पॉझिटिव्ह रुग्ण सोनार व्यावसायिक असल्याचा प्रशासनाचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.त्यामुळे सराफा लाईन मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आलेल्या सराफा व्यावसायिकाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिकांची यादी तयार करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत त्यानुसार आरोग्य यंत्रणेने कॉन्टॅक्ट मधील यादी करण्यास सुरुवात केली आहे तसेच अशा वर्कर च्या माध्यमातून मोबाईल व्हॅनद्वारे साधू नगर व मुडाणा येथील घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे कुठलेही लक्षणे दिसून येतात का.
हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील खबरदारीचा उपाय म्हणून महागाव येथील कोबिर सेंटरमध्ये रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दाखल करताना
याचीही खबरदारी घेतली जात आहे. विशेष म्हणजे सराफा लाईन मध्ये पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील जवळपास पाच ते सहा जणांना होमकोरण टाईन करण्यात आले आहे तर रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना व गावातील हायस्ट कॉन्टॅक्ट मधील नागरिकांना महागाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.