अनलॉक १: राज्य सरकारची नियमावली जाहीर, पहा काय होणार सुरू आणि काय बंद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केंद्र सरकारने अनलॉक १ ची घोषणा केली. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर आता राज्य सरकारने अनलॉक १ साठीची नियमावली जाहीर केली आहे. पाहूयात काय आहे या नियमावलीत…
केंद्र सरकारने नियमावली जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकारने नियमावली जाहीर केली
◆कंटेन्मेंट वगळता इतर भागात नियम शिथिल करण्यात आले आहेत
◆कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार
◆राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येणार
◆अनलॉकचा पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार
◆अनलॉकचा दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार
◆अनलॉकचा तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार
◆कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सरकारी कार्यालये सुरू होणार
◆१५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याची मुभा
◆१० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खासगी कार्यालय सुरू करण्याची मुभा
◆रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी, अत्यावश्यक सेवा सुरू राहणारचेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे अनिवार्य
◆कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला
◆पार्किंगप्रमाणेच सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू होणार
◆राज्यात मॉल्स, हॉटेल, धार्मिक स्धळे सुरू करण्यास तूर्तास परवानगी नाही, केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी राज्याने अद्याप दिली नाही
◆पुढील सूचना येईपर्यंत शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था सुरू होणार नाहीत
◆वाहन दुरुस्ती करण्यासाठी पूर्वपरवानगीने गॅरेज सुरू करण्यासाठी परवानगी
◆मेट्रो, लोकल सेवा, आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार
◆दोन जिल्ह्यांतर्गत बस वाहतूकीला परवानगी नाही
◆पेस्ट कंट्रोल, इलेक्टिशियन सारखी कामे सुरू होणार
◆अत्यावश्यक असल्यास दुचाकीवरुन एका व्यक्तिलाच प्रवास करण्याची परवानगी
◆कपड्यांची दुकाने सुरू करण्यास परवानगी
◆कपड्याच्या दुकानात ट्रायल रूम सुरू करण्यास परवानगी नाही
◆जिल्ह्यात ५० टक्के प्रवाशांसह बस वाहतूकीला परवानगी
◆६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घरातच राहण्याचा सल्ला
◆सिनेमागृह, जीम, स्विमिंगपूल, थिएटर, बार, एंटरटेन्मेंट पार्कवर निर्बंध कायम
◆सलून, ब्युटी पार्लर बंद राहणार
◆पहिल्या टप्प्यापासून रनिंग, जॉगिंग, सायकलिंगला बीच, खुल्या मैदानात परवानगी
◆अत्यावश्यक सेवेसाठी चारचाकी गाडीत १+२ व्यक्तिंना प्रवासाची परवानगी