बारभाई गावात आगीचा भडका ; ३ घरे,६ गोठे भस्म तर २ जनावरे मृत्युमुखी
रियाज पारेख ९६७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
महागाव :
तालुक्यातील लेवा परिसरात असलेल्या बारभाई तांडा येथे आगीचे तांडव निर्माण झाल्याने ३ घरे, जनावरां च्या निवाऱ्यासाठी बांधलेले ६ गोठे आगीत पूर्णतः जाळून खाक झाले आहे.गोठ्यात बांधून असलेले २ जनावरे मृत्युमुखी पडले आहे.ही घटना आज साडेअकरा च्या सुमारास घडली आहे.यात लाखोंचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
लेवा गावातील एक परिसर असलेल्या बार भाई गावात अचानक आग लागली.या आगीत बळीराम बक्षी पवार, गुंफाबाई बळीराम पवार,उमेश बळीराम पवार,भाग्यश्री बळीराम पवार,रोशनी उमेश पवार यांचे घर आगीच्या तावडीत सापडल्याने भस्म झाले आहेत,तर या घराना लागून असलेल्या जनावरांचा निवारा असलेल्या बाळू भिकू राठोड,संजय भिकू राठोड, रामधन राठोड, अंबादास रामचंद्र चव्हाण,मोहन रामसिंग राठोड, हितमन सखाराम आडे यांच्या मालकीचे गोठे बेचिराख झाले आहेत.

गोठ्यातील दोन कालवडी मृत्यू मुखी पडले आहे.आगी चा भडका उडाल्याने पुसद व उमरखेड येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्याने अग्निशामक दलांच्या साहाय्याने आग आटोक्यात आली.मात्र या आगीत अंदाजित २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.आगीच्या सानिध्यात आलेल्या घरांच्या नुकसानीचे अपघातग्रस्त कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने नुकसान ग्रस्ताणा तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आग विझविण्यासाठी आमदारांचा हातभार
आगीची माहिती मिळताच उमरखेड विधानसभेचे आमदार,भाजपा तालुकध्यक्ष दीपक आडे आणि कार्यकर्ते घटनस्थळी पोहचले त्यांनी आगीचा भडका पाहताच आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.तर आग आटोक्यात आणण्यासाठी हातभार लावला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!