हिंगोली जिल्ह्यात खळबळ : कळमनुरी तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण तर जिल्ह्यात 69 रुग्णांवर उपचार सुरू
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली जिह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील 8 जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण त्यांच्या गावाकडे मुंबई, पुणे व रायगड येथुन परत आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या 159 झाली असून त्यापैकी 90 व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर 69 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, संभाजीनगर व अन्य मोठ्या शहरामध्ये कामानिमित्त असलेले नागरिक गावाकडे परतत आहेत.कळमनुरी तालुक्यात महिनाभरापूर्वी एक रुग्ण आढळुन आल्यावर रुग्ण वाढले नव्हते. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील मुंबईहून 4, रायगडहून आलेले 3 व पुण्यातुन आलेला एक अशा 8 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संभाजीनगरला उपचार सुरू असलेल्या एका एसआरपीएफ जवानाला बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या संभाजीनगरला एक तर हिंगोली जिल्ह्यात 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”