बारा वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या ; हिंगोली तालुक्यातील धक्कादायक घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :
तालुक्यात नांदुसा येथे गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एका बारा वर्षीय मुलीचा गळा कापून खून करण्यात आला. प्रियंका शिवाजी कांबळे असे या मुलीचे नाव असून, या खुनामागील कारण कळू शकले नाही. नांदुसा येथे असलेल्या घरात प्रियंका आणि तिचा लहान भाऊ वय ( ९)दोघेच होते.भाऊ दुपारच्या वेळी बाहेर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले. दुपारी एकच्या सुमारास तिची मोठी बहीण घरी आल्यानंतर प्रियंका ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तिला दिसले. तिने तातडीने याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. मुलीचे आई-वडील काम करण्यासाठी शेतात गेले होते, तसेच शेजारी कोणीच घरी नसल्यामुळे या घटनेचा उलगडा झाला नाही. मुलीचे वडील कोतवाल असून ते सुद्धा कामासाठी शेतात गेले होते.घटनेची माहिती कळताच डीवायएसपी गनी शेख, स्थानिक गुन्हे शाखा,क्ष्वानपथक आणि मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला आहे.दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मुलीने आरडाओरडा केला असण्याची शक्यता असतानाही तिच्या मदतीला कोणीच कसे धावून आले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.