पोलिसाला कानशिलात मारल्याप्रकरणी सुनील कांबळेंवर गुन्हा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यातील ससून रुग्णालयात ५ जानेवारी रोजी राडा झाला होता. यादरम्यान भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातव यांच्या कानशिलात मारली होती.
त्यानंतर उद्घाटन पाटीवर त्यांचं नाव नसल्यानं सुनील कांबळे संतप्त झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील कांबळेंनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता सुनील कांबळेंच्या अडचणी वाढू शकतात. कारण त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात मारल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात आमदारावर IPC कलम ३५३ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला अथवा फौजदारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला भाजपच्या आमदाराने कानशीलात लगावली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले. त्या नंतर त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली होती. तसेच स्टेजवरून खाली उतरत असताना आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. आमदार सुनील कांबळे यांनी मात्र आपण कुणालाही मारहाण केली नसल्याचे सांगत सारवासरव केली होती. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….