मुंबईतील संग्रहालयांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील नामांकित संग्रहालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. वरळीचे नेहरू विज्ञान केंद्र, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय इत्यादींसह अनेक प्रमुख संग्रहालयांना अज्ञात स्त्रोतांकडून बॉम्बस्फोटाचा इशारा देणारे धमकीचे ई-मेल प्राप्त झल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ई-मेल अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी सकाळपासून अनेक संग्रहालयांमध्ये केले होते. पहिला ईमेल CSMVS कडून कुलाबा येथे प्राप्त झाला आणि यानंतर इतरांनाही प्राप्त झाला.
संग्रहालयांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकासह संग्रहालयाभोवतीच्या परिसरात तपास सुरू केला. मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळून आले नाही.
पोलिसांनी ईमेल प्राप्त झालेल्या सर्व संग्रहालयांची तपासणी केली. शुक्रवारी रात्री कुलाबा पोलिसांनी बॉम्बस्फोटांबद्दल फसव्या ई-मेल पाठवल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अवघ्या पाच दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला, पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. ज्याने शहरात बॉम्बस्फोटाचा इशारा दिला होता. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करणाऱ्या कॉलरने सांगितले की, नवीन वर्षात शहरात बॉम्बस्फोट होणार आहे आणि त्याने कॉल डिस्कनेक्ट केला होता.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….