फडणवीस प्रचाराला गेले तेथे पक्षाला चांगले यश ; भारत जोडो अपयशी ठरल्याचा भाजप नेत्याचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची परिस्थिती पाहता राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यांची खोटी आश्वासनेही जनतेने झिडकारली आहेत, अशी टीका भाजप विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे केली.
चार राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत आज पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. जनता भाजपच्या बाजूने असल्यामुळे या निवडणुकीत प्रचंड यश भाजपला मिळाले. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी आणलेली ‘लाडली बहना’ योजना लोकप्रिय झाली. आता तेथील मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या माध्यमातून या देशातील जनतेचा विश्वास मिळवला. त्यामुळे भाजप भविष्यात काम करू शकेल यावर जनतेने विश्वास व्यक्त केला. ही केवळ लाट नाही तर मोदींचे कर्तृत्व आहे. त्यांच्या कामावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे जे तज्ज्ञ नाकाने कांदे सोलत होते त्यांना उत्तर मिळाले आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. जेथे देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले तेथेही भाजपला चांगले यश मिळाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..