संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात ; या मुद्द्यांवर होणार चर्चा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये चार राज्यांच्या निकालानंतर आज दुसऱ्याच दिवशी होत असलेल्या अधिवेशनाकडं सर्वांच लक्ष लागले आहे.
आज (सोमवार) सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या बाहेरून अधिवेशन सुरळीत पार पडाव यासाठी संबोधित करणार आहेत. दरम्यान आज पहिल्याच दिवशी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट अध्यक्षांसमोर सादर केला जाणार आहे.
संसदेच्या 19 दिवसांच्या या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत. IPC, CrPC आणि एविडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता देखील आहे. पावसाळी अधिवेशनावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी ती लोकसभेत मांडत स्टॅडींग कमिटीकडे पाठवली होती. अनेक मिटिंग नंतर 10 नोव्हेंबरला कमिटीने आपला रिपोर्ट सादर केला होता.
या सोबतच मुख्य निवडणुक आयुक्त आणि बाकी निवडणुक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात देखील विधेयक मांडले जाणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अधिवेशनातील रणणीती बाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बैठक होणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..