तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. ही कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्याचे वृत्त आहे.

तेलंगणाचे पोलीस प्रमुख अंजनी कुमार यांच्यासह राज्य पोलीस नोडल अधिकारी संजय जैन यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वी तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि उमेदवार रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती. ‘एएनआय’ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी रेड्डी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करताना दिसले.
दक्षिणेकडील राज्यात पहिले सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस तेलंगणामध्ये साध्या बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसची वाटचाल ही निर्णायक बहुमताकडे असून ६४ जागांवर आघाडीवर आहे. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ६० जागांचा आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..