पाचही राज्यांमध्ये भाजपचा दावा म्हणजे मोठा विनोद, संजय राऊतांची टीका….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभेआधी पाचही राज्यांमध्ये भाजपने दावा केला आहे. भाजपने केलेला दावा म्हणजे विनोद आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजस्थानमध्ये (Rajsthan) भाजपला यश मिळालं तर वसुंधरा राजेंना त्याचं श्रेय द्यावं लागेल, असे देखील राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, पाचही राज्यात भाजपने दावा केला असेल तर तो एक विनोद म्हणून आपण घ्यायला पाहिजे. मिझोराममध्ये भारतीय जनता पक्ष कुठे औषधालाही दिसत नाही आहे मिझोरममध्ये भाजप नाही आहे छत्तीसगडमध्ये देखील भाजप नाही आणि तेलंगणामध्ये देखील भाजप नाही. मध्यप्रदेशमध्ये आता भाजपमध्ये ट्रेण्ड मध्ये चालत आहे. तेलंगणांमध्ये भारतीय जनता पक्ष आता चौथ्या क्रमांकावर आहे.तेलंगणामध्ये काँग्रेस पुढे आहे, त्यांना दहा जागाही भेटण्याची शक्यता नाही आहे.छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार येणार आहे.मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये यावेळी संघर्ष आहे जोरदार लढाई आहे. काँग्रेस आणि भाजपला दोन राज्यांमध्ये यश मिळालं तर त्याचा श्रेय मोदी किंवा शहा यांना नसणार आहे. याचे श्रेय मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चव्हाण मामाजी आणि राजस्थानमध्ये महाराणी वसुंधरा राजे शिंदे यांचे आहे. या दोघांमुळे तिकडे यश मिळाले आहे.
शेवटच्या फेरीनंतरच निकाल स्पष्ट होईल
मध्य प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सलग चौथ्या वेळी भाजपचं सरकार येण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, एकतर्फी निकाल कधीच येत नाही. तेलंगणमध्ये देखील एकतर्फी निकालाचे विश्लेषण आपण ऐकले होते. परंतु आताही तिकडे केसीआर आणि काँग्रेसमध्ये अजूनही टक्कर चालू आहे हे सुरुवातीचे कल आहेत. पंचवीस ते तीस राऊंड मतदानाचे होत असतात. आता पाचवी फेरी चालू आहे सहावी फेरी चालू आहे. त्यामुळे तुम्ही शेवटच्या फेरीपर्यंत थांबायला हवं हे माझे स्पष्ट मत आहे. एक दीड वाजता या संदर्भात स्पष्ट निकाल येईल.
तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय
राजस्थानमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अजूनही निकाल स्पष्ट नाही. पाच राजाच्या निवडणुका आहेत यामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होणार आहे. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसचे राज्य येईल. मिझोरममध्ये तेथील प्रादेशिक पक्ष सत्तेवर येईल. हे तीन निकाल सोडले तर राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये खूप मोठी टक्कर होणार आहे. आता जे समोर आहेत ते कल आहेत त्याला आपण ट्रेंड म्हणतो. अनेकदा ट्रेंड कायम राहतात नाहीतर राहत नाही. आम्ही बिहारला पाहिला आहे. या दोन पैकी एका राज्यात मध्यप्रदेश किंवा राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होणार याची आम्हाला खात्री आहे.