‘राऊत शिवसेनाप्रमुख होण्याचं स्वप्न बघातायत’, दादा भुसेंचे घणाघाती आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संजय राऊत शिवसेनाप्रमुख होण्याचं स्वप्न बघत आहेत, असं म्हणत मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मालेगावी केलेल्या आरोपाचा पालकमंत्री दादा भुसे यांनी जोरदार समाचार देखील घेतला.
मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर शिवसेना खासदार संजय खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहोचले.
मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यावर दादा भुसे यांनी राऊतांवर मानहानीचा दावा केला होता. या दाव्यानंतर संजय राऊत हे शनिवार 2 डिसेंबर रोजी मालेगावच्या न्यायालयात हजर राहिले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करुन पुढील सुनावणीसाठी 3 फेब्रुवारी ही तारीख दिली. दरम्यान यावेळी खासदार राऊत हे मालेगाव न्यायालयात असाताना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राऊत काही स्वातंत्र्यसैनिक नाहीत, दादा भुसेंचा पलटवार
राऊतांवर जामिनासाठी मालेगावात यावं लागलं. ते काही स्वातंत्र्यसैनिक नाहीत. त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यामुळे त्यांना मालेगावात येऊन माफी मागावीच लागेल. राऊतांना मालेगावाची माफी मागावी लागेल, असं म्हणत मंत्री दादा भुसेंनी राऊतांवर निशाणा साधला.
राऊत दलाल आहेत – दादा भुसे
संजय राऊत हे दलाल आहेत. त्यांनी शिवसेनेचं मीठ खाल्लं .शिवसेनेचे मीठ खायचे अन राष्ट्रवादीची दलाली करायची. त्यांना मुख्यमंत्री होण्याची देखील स्वप्न पडत असल्याचा गंभीर आरोप यावेळी मंत्री दादा भुसे यांनी केला. मी देखील बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. नोटीशीला मी घाबरत नाही. राऊतांनी इतर ठिकाणी नौटंकी दाखवावी. पोपटपंची करून कोणी आमदार होत नाही त्यासाठी जनतेत जावे लागते. मालेगावचा आमदार कोण होणार हे राऊत नाही, तर मालेगावची जनता ठरवेल, असं दादा भुसे म्हणाले.
‘अद्वय हिरेंची बाजू घेताना लाज नाही का वाटत?’
ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करण्यात आलीये. यावर देखील मंत्री दादा भुसे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, अद्वय हिरेंनी जिल्हा बँकेची फसवणूक केलीये. गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांची लूट केलीये. अशा अद्वय हिरेंची बाजू घेताना राऊतांना लाज नाही का वाटत.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….