पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
शहरातील पाळसवाडी पोलीस वसाहत परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेने एकच खळबळ उडाली ही घटना मंगळवार, १२ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय रतीराम साबळे वय २८ वर्ष रा. पोलीस वसाहत, यवतमाळ असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. यवतमाळ शहर रेडझोनमध्ये असल्याने पोलिसांवर मोठी जबाबदारी आलेली आहे. अशातच पळसवाडी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय पोलीस कर्मचारी संजय साबळे याने आपल्या घरातच मंगळवारी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.याबाबतची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहरचे ठाणेदार धनंजय सायरे, आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. साबळे हे पोलीस मुख्यालयात असून सध्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दिवसांपासून आपले कर्तव्य बजावत होते. गेल्या महिन्याभरा पूर्वी त्याने वॉट्सप्प वर स्टेटस ठेऊन तो विवंचनेत असल्याचे सांगितल्याचे माहिती यावेळी सूत्रांनी दिली संजय साबळे याची पत्नी प्रसूती साठी माहेरी गेली असून तो सध्या एकटाच या वसाहतीत राहत होता.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….