प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार, तालुका अध्यक्षांसह ३०० कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गोंदिया :- एकीकडे निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या संघर्षाची सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
गोंदियामध्ये राष्ट्रवादीच्या युवक तालुका अध्यक्षांसह ३०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. मात्र गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांचा गृह जिल्हा असल्याने राष्ट्रवादीत कुठेही फूट पडल्याचे पाहायला मिळाले नव्हते. मात्र आज (रविवार, ८ ऑक्टोंबर) राष्ट्रवादीसह मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष रोहीत बनोटे सह जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोळचीट्टी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीसह प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांनी देखील आपल्या १०० कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच भाजपच्या देखील 50 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे.
काँग्रेसचे देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जवळपास ४५० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर या पक्षप्रवेशानंतर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळ मिळाला असून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….