आता शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी ; माहिती देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांसंदर्भात अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची टीका शरद पवार गटाकडून केली जात आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनयाचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याची सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी अर्थात शुक्रवारी होणार आहे.
दोन्ही गटांच्या याचिकांवर एकत्र सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर आज होणारी सुनावणी येत्या शुक्रवारी अर्थात १३ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. त्याच दिवशी ठाकरे गटाच्या याचिकेवरही सुनावणी होणार असून या दोन्ही गटांच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेतली जाणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी नमूद केलं. यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली.
“सर्वोच्च न्यायालयाकडून आमच्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत. आम्हाला काहीसा न्याय मिळाल्याचं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या याचिका १३ तारखेला सुनावणीला घेतल्या जातील. न्याय मिळेल असं मला वाटतंय. आम्ही २ जुलैलाच अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. त्या कधी दाखल केल्या हे महत्त्वाचं नसून निर्णय कधी होईल हे महत्वाचं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
“सनातन हा धर्म नाही”
दरम्यान, शरद पवार, जितेंद्र आव्हाड सनातन धर्मविरोधी असल्याच्या भाजपाच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला आहे. “ज्या धर्मानं देशात जातीवाद आणला, स्त्रियांना अधिकार मिळाला नाही तो धर्म नाही. सनातन हा धर्म नाही. हिंदू धर्मातल्या कट्टरवाद्यांना सनातन म्हणतात. सनातन कधीच धर्म नव्हता. ६ महिन्यांपासून हा नवीन धर्म कुठून शोधून आणला तेच कळत नाहीये. आम्ही २००३-०४ पासून सनातनविरोधात लढा देतोय. मला मारण्याचा प्रयत्न झाला, ते सगळे सनातनीच होते. हिंदू धर्म वसुधैव कुटुंबकम् मार्गावर चालणारा आहे. सगळ्यांना आपलंसं मानणारा आहे”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.
“धर्मात जो काही ५ हजार वर्षांचा अन्याय आहे, तो सनातन्यांनी केला. संत तुकारामांना, बुद्धाला, महावीर जैनांना, बसवेश्वर अण्णांना, ज्ञानेश्वर माऊलींना, सावता माळींना, बाबासाहेब आंबेडकरांना सनातन्यांनी छळलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईृ-वडिलांनी सनातन्यामुळे आत्महत्या केली. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सनातन्यांनी नाकारला. महात्मा फुले-सावित्रीबाईंना दगड-गोटे, शेण सनातन्यांनी मारलं. शाहू महाराजांची हत्या करण्याचा प्रयत्न सनातन्यांनी केली. महात्मा गांधींची हत्या सनातन्यांनी केली. सनातन्यांचा आणि हिंदू धर्माचा तसा काही संबंधच नाही”, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….