कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मागील ११ दिवसांपासून या घटनेमुळे लोकांनी कलिंगड खाणे बंद केलं होतं.
पण, आता फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या चौघांचा मृत्यू हा उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचं समोर आलं आहे. चौघांच्या शरिरामध्ये झिंक फॉस्फराईटचे अंश सापडले आहे. त्यामुळे कलिंगडला या प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे.
मुंबईतील पायधुनी येथील घाटी मोहल्ला परिसरात राहणाऱ्या डोकडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मोगल उमरेट्टी इमारतीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला डोकडिया (४०), नसरीन डोकडिया (३५), आयशा डोकडिया (१६) आणि झैनब डोकडिया (१३) या चौघांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टम, FDA च्या अहवालानंतर आता फॉरेन्सिकचा अहवाल समोर आला आहे.
फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काय आढळलं?
डोकडिया कुटुंबातील काही तासांच्या अंतराने ४ जणांचा मृत्यू झाला होता. FDA ने चाचणी केली होती. त्यात कलिंगडमध्ये कोणतीही विषारी घटक आढळले नाही. पण आता न्यायवैद्यकीय अहवाल समोर आला आहे. ४ जणांमध्ये झिंक फॉस्फराईटचे अंश आढळलं आहे. हे उंदीर मारण्याचं औषध समजलं जात आहे. डोकडिया कुटुंबीयांच्या चारही सदस्यांच्या शरिरामध्ये झिंकत फॉस्फराईट सापडलं आहे, असं रिपोर्टमध्ये आढळून आलं आहे.
सामूहिक आत्महत्या की हत्या?
अशी देखील माहिती समोर आली आहे, ज्यावेळी चौघांनी उलट्या झााल्या आणि प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना फॅमिली डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं. तिथे उलट्या झाल्यामुळे पोटातलं झिंक फॉस्फराईट बाहेर पडलं. त्यामुळे झिंक फॉस्फराईटचे अंश इतर रिपोर्टमध्ये सापडले नाही. पण, कलिन न्यायवैद्यकीय लॅबमध्ये याची चाचणी करण्यात आली, अनेक तज्ञांचा त्यांनी सल्ला घेतला. तेव्हा चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फराईट सापडलं आहे, त्यामुळे आता ही सामूहिक आत्महत्या होती की हत्या होती, असा प्रश्न आता उपस्थितीत झाला आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये का नाही आढळलं?
कलिंगडमध्ये मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. सर्वात आधी चारही जणांचं पोस्टमार्टम हे जेजे रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं. पोस्टमार्टमध्ये रिपोर्टमध्ये मृत्यूचं नेमकं कारण हे नोंदवण्यात आलं नव्हतं. कारण, चारही जणांचे मेंदू, हृदय आणि आतडी चक्क हिरवी पडली होती. सामान्य विषबाधेत शरीरात असा बदल सहसा दिसत नाही. डॉक्टरांच्या मते, हा एखाद्या अत्यंत विषारी रासायनिक घटकाचा परिणाम असू शकतो. असं फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्राथमिक बाबीमध्ये आढळलं होतं. त्यामुळे पोस्टमार्टमचा रिपोर्ट हा पेंडिंग असा शेरा मारून थांबवण्यात आला होता.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….
थलपती विजय विरुद्ध राज्यपाल..! तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात प्रकाश आंबेडकरांची उडी; ‘या’ दोन मोठ्या राजकीय घटनांचा दिला दाखला….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….