अखेर अभिनेत्री नुसरत भरुचा मुंबईत पोहचली…! चाहत्यांना मोठा दिलासा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- इस्त्राईलमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलेली बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा ही अखेर भारतात परतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काही तासांपूर्वी नुसरत बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या.
शनिवारी हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राईलवर हल्ला केला होता. त्यात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचे दिसून आले होते. या घटनेनं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना सुरुवातही झाली होती. त्यात इस्त्राईलचे सरकार पूर्णपणे हादरुन गेल्याचे दिसून आले. अनेक देशांनी त्यांना आपला पाठींबाही दर्शवला होता.
यासगळ्यात बॉलीवूडची अभिनेत्री ही इस्त्राईलमध्ये अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतातील तिच्या चाहत्यांना आणि कुटूंबियांना तिच्याविषयी मोठी काळजी वाटू लागली होती. काही तासांपूर्वी अभिनेत्रीच्या कुटूंबियांनी ती सुखरुप असून दुबईमार्गे मुंबईत येणार असल्याचे सांगितले होते.
काही वेळेपूर्वी नुसरत ही मुंबईच्या विमानतळावर आल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी थेट युद्धाची घोषणा केली आहे. गाझा पट्टीतील ‘हमास’ या दहशतवादी गटानं जो हल्ला केला त्यात शंभराहून अधिक जण ठार झाले आहेत. यात इस्त्राईलनं देखील हमासला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
काही तासांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, नुसरतच्या टीममधील संचिता त्रिवेदी यांनी म्हटले होते की, नुसरतशी संपर्क झाला असून ती काही वेळानंतर भारतात येणार आहे. त्यानंतर तिचे भारतात आगमन झाले आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….