उत्तर देण्याइतके संजय राऊत मोठे नाहीत :- देवेंद्र फडणवीस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मी उत्तर द्यावे इतके संजय राऊत मोठे नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मदारी असून, त्यांच्या तालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाचावे लागत आहे’, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता फडणवीस बोलत होते. कदाचित राऊत त्यांच्या पार्टीतले सांगत असतील, असे सांगत कोण मदारी आणि कोण माकड आहे हे सर्व जनतेला ठाऊक आहे, या शब्दांत राऊत यांच्या टीकेचा समाचार फडणवीस यांनी घेतला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपने आरोप केलेल्या नऊ मंत्र्यांना काढावेच लागेल, असे वक्तव्य केले. यासंदर्भात फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी आमची चिंता करू नये, आपले पद आणि आपला पक्ष सांभाळावा, असा पलटवार केला.
आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल फडणवीस यांनी अभिनंदन केले. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी, फडणवीस यांनी केंद्रात जावे. शिंदे – अजितदादा महाराष्ट्र सांभाळतील, असे वक्तव्य केले. याकडे लक्ष वेधले असता शिरसाट यांच्या शुभेच्छा मला मान्य आहेत, अशी मिश्किली त्यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….