महायुती सरकारच्या नाड्या दिल्लीत :- संजय राऊत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मदारी असून, त्यांच्या तालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाचावे लागत आहे. कारण या सरकारच्या नाड्या दिल्लीत आहेत.
ते या नाड्या कधीही खेचतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धावपळ करत दिल्लीला जावे लागते, अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार घणाघाती हल्ला चढवला.
महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था एकदम बिकट आहे. नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या आठ दिवसांत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकी घटना घडूनही सरकार आहे कुठे, असा सवाल करत मुख्यमंत्री दिल्लीत नक्षलवादावर चर्चा करत आहेत. पण, जितके लोक महाराष्ट्रात नक्षलवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले नाहीत, तेवढे गेल्या आठ दिवसांत मरण पावले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. या मृत्यू प्रकरणावरूनही उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असताना तुम्ही जबाबदारी कशी झटकू शकता, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत का पळून गेले, हे शरद पवार यांनी कालच सांगितले आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिवसेना फोडण्याची हिंमत नाही; पण ईडी आणि सीबीआयने एकनाथ शिंदेंना फोडले, असा आरोप राऊत यांनी केला. मंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपवाले व सोमय्या जेलमध्ये टाकायला निघाले होते. पण, आता गेल्या दहा वर्षांत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे उच्चपदावर आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….