उत्कृष्ट वैद्यकीय सेवा कार्याबद्दल पुसद येथे सर्व सामाजिक संघटनेकडून डॉ रूणवाल यांचा स्वच्छतेसाठी डस्टबिन व परिसरात वृक्षरोपण करून आगळावेगळा सत्कार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद परिसरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सेवाभावी संघटना तथा सेवाभावी वृत्तीने मानवीय काम करणाऱ्या सर्व बंधू-भगिनींनी कडुन आगळावेगळा उपक्रम.
सामान्य लोकांसाठी सदैव असमान्य कार्य करण्याची धडपड करणारे व सामान्यांना त्यांच्या जीवनात आरोग्यमय समाधान मिळून देण्यासाठी अविरत कार्य करणारे डॉक्टर रुणवाल.
उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नुकतेच रुजू झालेले डॉ अतुल सुरेश रुणवाल यांनी आपल्या ड्युटीवर रुजू होताच काही दिवसात दवाखान्यात स्वच्छता व रुग्णांना सर्व प्रकारची मदत देऊन कायापालट केला, दवाखान्यातील सर्व रुग्णांना सर्व प्रकारचे सुविधा कशी प्राप्त होईल याकरिता दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत, त्यांच्या या मानवी कार्याला मदत व्हावी म्हणून त्यांच हे सर्व कार्य पाहता पुसद परिसरातील सामाजिक संघटना तथा सेवाभावी वृत्तीने माननीय काम करणारे सर्व बंधू भगिनी त्यांच्या पाठीमागे उभे राहून,आपणही या कार्यास कशी मदत करू या प्रयत्नात होते, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधून 2 ऑक्टोंबर रोजी माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे त्यांचा सत्कार करून त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे बाहेरील परिसरात सौंदर्यीकरण करण्यासाठी सुंदर झाडे व आतील वॉर्ड मध्ये पाच डस्टबिन माणुसकीची भिंत कडून मदत म्हणून देण्यात आले. यावेळेस उपस्थित सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद, शैलाताई सावंत गीताई संस्था, मराठा सेवा संघ मिशन ग्रीन पुसद,मिशन ग्रीन भवानी टेकडी, निसर्ग संवाद,सेव नेचर ग्रुप,वनोद्यान १ मिशन ग्रीन, गौरव्रुक्ष पर्यावरण संवर्धन समिती, सावली ग्रुप,कालिका देवी संस्थान,आर्य वैश्य समाज,संत सेवालाल जयंती उत्सव समिती बंजारा कॉलनी, गंणबादेव गणपती मंडळ ट्रस्ट सांची सामाजिक बहुउद्देशीय संस्था भीमवाडी, पत्रकार बंधू, माणुसकीच्या भिंतीचे सर्व सदस्य तसेच माणुसकीची भिंत सर्व शुभचिंतक व पुसद मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….