मनोज जरांगे आजपासून पुन्हा मैदानात…! राज्यातील १३ जिल्ह्यांचा करणार दौरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील१३ जिल्हात होणाऱ्या या दौऱ्याची सुरूवात जालन्यातील अंतरवली सराटी गावातून केला जाणार आहेत.
या दौऱ्याचा पहिला थांबा हा परभणीच्या जिंतूर येथे होणार आहे.
मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. यानंतर मराठवाड्याबाहेर सोलापूर, नगर, नाशिक, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात देखील मनोज जरांगे दौरा करणार आहेत.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांच्या वेळेमधील ३० दिवस १४ ऑक्टोबर रोजी संपणार आहेत. यापूर्वी जरांगे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मनोज जरांगे १४ तारखेला मराठा समाजाची जाहीर सभा घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण दौऱ्यामध्ये मनोज जरांगे यांच्याकडून राज्यातील मराठा समाज बांधवांना शांततेचं अवाहन करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तसेच १४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी गावात होणाऱ्या सभेसाठी देखील ते १३ जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना अवाहन करतील. मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी मनोज जरांगे यांचा हा दौरा होत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..