आता तहसीलदार पदंही कंत्राटी पद्धतीनं भरणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यापूर्वी सरळसेवा भरती कंत्राटी पद्धतीनं भरण्याची जाहीरात सरकारनं काढली होती.
आता तहसीलदार पदासाठीही कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळं राज्य सरकारनं होतकरु तरुणांना पुन्हा एकदा झटका दिला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार , जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं तहसीलदार पदाची जाहिरात काढली असून ही भरती कंत्राटीपद्धतीनं होणार आहे. या जाहिरातीनुसार, नायब तहसीलदार, कारकून पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) प्रशासनात येण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
तहसीलदारपदासारखी जागा जर कंत्राटी पद्धतीन भरली जाणार असेल तर आम्ही काय करायचं? असा सवाल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..