‘आज माझ्याकडे अर्थखातं, कधीपर्यंत टीकेल माहित नाही’; अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काल उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. येथील पाच संस्थांच्या बैठकीसाठी अजितदादा उपस्थित होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते, यावेळी अजितदादांच्या गैरहजेरीवर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या, तर काल अजितदादांनी केलेल्या एका वक्तव्यामुळेही जोरदार चर्चा सुरू आहेत.
काल बारामती येथे एका संस्थेच्या बैठकीवेळी अजित पवार यांनी भाषण केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही’, असं विधान अजितदादांनी केलं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. महायुतीत अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
अजित पवार म्हणाले, टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. यानंतर लगेचच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखातं आहे, त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्रीय संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. जिथे चुका होत असतील तर दुरुस्त केल्या पाहिजेत, असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, भविष्यात काय होईल हे कुणालाच माहित नसतं. यामुळे पवार यांचे हे विधान नैसर्गिक आहे, ते राजकीय विधान नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..