शांतता समितीच्या सभेत प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष किशोर कांबळे यांचा सत्कार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- भव्य दिव्य अशा प्रबोधन पर्वा सोबतच जयंतीचा जल्लोषातील व हजारोंच्या संख्येतील मिरवणुकीला शांततेच्या मार्गाने समितीच्या वतीने भव्य दिव्य आयोजनाचा आदर्श सर्व उत्सव समितीने घ्यावा यासाठी शांतता समितीच्या सभेमध्ये प्रज्ञा पर्व चे अध्यक्ष किशोर कांबळे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव चे अध्यक्ष पदाची जबाबदारी समाजाने नेहमी तळागाळातील प्रश्नाला हाताळून न्याय मिळवून देणारे भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी आपल्या पदाधिकारी सदस्यांच्या मदतीने प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती घडविली. व प्रज्ञापर्व प्रबोधन कार्यक्रम यशस्वी, शांततेने आणि नियोजन पद्धतीने राबविला. त्यासोबतच 14 एप्रिल च्या जयंती उत्सवामध्ये वार्डावार्डातून निघणाऱ्या निवडणुकी ला शिस्तबद्ध करणे भव्य दिव्य मिरवणुकीत समाविष्ट करून शांततेच व हर्षोल्हासात जयंती साजरी केली. त्यामुळे या समितीच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष किशोर कांबळे व समिती पदाधिकाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, जिल्हाधिकारी पंकज आशिया तसेच आमदार आमदार निलय नाईक,आमदार वजाहत मिर्झा व आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..