अजित पवार गटानं ‘या’ चार आमदारांची नाव का वगळली..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू आहे. असं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत
शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. पण या सगळ्यात विशेष बाब म्हणजे शरद पवार गटातील चार आमदारांची नावं अजित पवार गटाकडून वगळण्यात आली आहेत.
अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील नऊ विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
अजित पवार गटाकडून विधानसभेच्या 9 आणि तीन विधानपरिषदेच्या आमदारांविरोधात याचिका दाखल केली. यामध्ये विधानसभेतील
1) जयंत पाटील
2) जितेंद्र आव्हाड
3) रोहित पवार
4) सुनील भुसारा
5) प्राजक्त तनपुरे
6) बाळासाहेब पाटील
7) अनिल देशमुख
8) राजेश टोपे
9) संदीप क्षिरसागर
या आमदारांची नावं आहेत.
विधान परिषदेतील या आमदारांविरोधात याचिका
1) शशिकांत शिंदे
2) अरुणकाका लाड
3) एकनाथ खडसे
यांची नावं देण्यात आली आहेत.
अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील चार आमदारांची नाव मात्र वगळली आहेत. ज्यामध्ये आमदार अशोक पवार, सुमनताई पाटील, नवाब मलिक आणि चेतन तुपे यांचा समावेश आहे. यावरुन आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….