सुप्रिया सुळेंनी दिली भाजप खासदाराविरोधात हक्कभंगाची नोटीस, नेमकं प्रकरण काय..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेत बोलतना भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी शुक्रवारी बसपा खासदाराबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. याप्रकरणी देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीय सुळे यांनी लोकसभा सचिवालयाकडे बिधुरू यांच्याविरोधातील हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. रमेश बिधुडी यांनी केलेलं वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांची नोटीसद्वारे केली आहे.
बिधुडी यांचे वक्तव्य लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणार आहे, नियमानुसार ही वक्तव्य हक्कभंगमध्ये बसत त्यामुळे यात हस्तक्षेप करत प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा असे सुप्रीया सुळे म्हणाले.
नेमकं झालं काय?
लोकसभेत चांद्रयान-३ बाबत चर्चा सुरू असतना भाजपचे खासदार रमेश बिधुडी हे बोलत होते, यादरम्यान बसपा खासदार दानिश अली यांनी त्यांना मध्येच टोकलं. यावरून भडकलेल्या बिधुडी यांनी संसदेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. दरम्यान या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी भाजपवर निशाणा साधला असून खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.