अखेर.. रास्त दुकानाचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे
पॉलिटिक्स स्पेशल पोर्टल च्या दणक्याने निलंबनाचा प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया जलद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव / हीवरा :
एप्रिल महिन्यात राशन कार्ड लाभार्थ्यांना धान्य कमी देणे,ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देवून अपमानित करणाऱ्या महागाव तालुक्यातील आनंदवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना निलंबित करण्यासाठी तालुका प्रशासनाने निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे रास्त धान्य दुकानदारांची धाबे दणाणले आहेत.पॉलिटिक्स स्पेशल ने अवघ्या काही तासांपूर्वी बातमी प्रकाशित करून सील करण्यात आलेल्या रास्त धान्य दुकानदाराच्या गैरकारभाराची पोलखोल केली होती. मात्र सदर प्रकरण गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचा पॉलिटिक्स स्पेशल ने प्रकाशित केलेल्या बातमीने पर्दाफाश केला आहे.
अनंतवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार आर. टी.राठोड एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांना धान्य कमी दिली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती.तक्रारीची गंभीर दखल घेत आज सकाळी तहसीलदार निलेश मडके,पुरवठा निरीक्षक दिनेश आडे यांनी आकस्मित भेट देवून स्वस्त धान्य दुकानाची चौकशी केली.मिळालेल्या माहितीनुसार काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले धान्य दुकानदाराच्या घरात ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.त्यावेळी पाहणी केली असता गहू आणि तांदळाचे पोते संशयास्पद आढळुन आल्याने धान्य असलेल्या खोलीला तालुका प्रशासनाने सिल केले.आणि पंचनामा केला.केलेल्या पंचनाम्यात अधिकाऱ्यांना सदर दुकानदार दोषी आढळला आहे.
परंतु सदर प्रकरण गुंडाळण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पॉलिटिक्स स्पेशल पोर्टल ला मिळाल्याने सत्य बातमी प्रकाशित करून प्रकरणाला कलाटणी दिली.आणि तालुका प्रशासन खडबडून जागे झाल्याने आज दुपारी सदर दुकानाचा निलंबनाचा प्रस्ताव तालुका प्रशासनाने जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला आहे.त्यामुळे अनंतवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार च्या परवान न्यावर अमानत रक्कम जप्तीची कार्यवाही करुन परवाना निलंबित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.