……आणि तळीरामांचा भ्रमनिरास झाला ! पुन्हा जिल्हाधिकारी यांचे मद्य विक्रीबंदीचे आदेश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे दिनांक ५ मे २०२० आदेशानुसार (यवतमाळ नगर परिषद हद्द सोडून) पुढील आदेशापर्यंत अटीस आधीन राहून मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली होती. या परवानगी नुसार जिल्ह्यातील वणी येथे हे मद्य विक्रीचे दुकान चालू करण्यात आले होते. तसेच इतर ठिकाणी मद्य विक्रीचे दुकान चालू होणार या बातमीने तळीराम खूश झाले. उद्या सकाळीच मद्य विकत घेण्यासाठी तयारी करत असताना आज काही तासा पूर्वी अचानक जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा मद्य विक्री बंद बाबत आदेश धडकला त्यात सूचित केले की, यवतमाळ नगर परिषद हद्दीमधील अनुज्ञप्ती वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागातील किरकोळ विक्री अनुद्यपत्या तसेच संपूर्ण जिल्ह्यातील सी एल२ एफ एल१ अनुज्ञप्ति सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी आदेश देण्यात आले होते .
तथापि कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वरील प्रमाणे नमूद अनुद्यप्ती सुरू करण्याबाबतचे आदेश या द्वारे रद्द करण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५व महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४८ कलम १४२ (१)अन्वये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व किरकोळ व ठोक मद्य विक्री अनुद्यप्ती (एफ एल1, सी एल २,)पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.

या आदेशाचे पालन न करणार्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता १८६०( ४५) कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येइल त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारूबंदी कायदा आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. सदर आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जारी केल्यामुळे तळीरामांचा भ्रमनिरास झाला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….