शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या स्वीय सहाय्यकाच्या घरावर मोर्चा
पोलिसांनी जमावाला पांगवले ; किराणा किट वाटप वरून गोंधळ ; नेर येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूवंतासाठी आलेल्या किराणा किट दुसरीकडे वाटप करण्यात आल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांच्या स्वीय सहाय्यककाच्या घरी शेकडो महिला व नागरिकांनी धडक दिली. ही घटना नेर येथे
शनिवारी सायंकाळी घडली असून घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांना पाचारण करून प्रकरण शांत करण्यात आले. दरम्यान शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांच्या स्वीय सहाय्यकाला धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना मुळे सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे
गरीब गरजूंची प्रश्न अतिगंभीर झाले आहे.हातावर आणणे आणि पाणावर खाणाऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुणाकडून मदत मिळते याची चाचपणी गरजुवंत करू लागले आहेत. शनिवारी यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या कडून गरजवंतांना वाटप करण्यासाठी २७५ किराणा साहित्य असलेली किट पाठविण्यात आली होती. या किट छत्रपतीनगर यासाठी आल्याची माहिती या नगरातील नागरिकांना मिळाली होती. त्यांनी खासदार भावना गवळी यांचे स्वीय सहाय्यक नितीन खैरे यांना गाठले. आलेल्या किट छत्रपती नगरसाठी नव्हत्या गरजूंना वाटप करण्यासाठी आल्या होत्या,असे स्वीय सहाय्यक खैरे यांनी नागरिकांना सांगितले. यावर गरजुवंत यांचे समाधान झाले नाही .थोड्या वेळानंतर १०० ते १२० नागरिकांचा समूह सहाय्यक खैरे यांच्या घरावर धडकला. त्यावेळी प्रचंड गदारोळ उडाला होता.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार खासदार भावना गवळी यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जमावाला पांगवले असल्याची माहिती समोर आली असून वृत्त लीहेपर्यंत पोलिसात तक्रार झाली नव्हती. किराणा किट वाटपावरून नेर तालुका चांगलाच वाद पेटल्याचे बोलल्या जात आहे.
************************”***”**
छत्रपती नगरातील जमाव आपल्या घरावर किराणा साहित्य किट वाटपावरून आला. त्यांनी वाद घातला. धक्काबुक्की केली . पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस दाखल झाले. त्यांनी जमावाला पंगविले.
– नितीन खैरे
स्वीस सहाय्यक नेर.