दिग्रसच्या बड ग्रुप कडून “सिएम फंड”ला ७० हजार
तहसीलदार यांच्याकडे दिला धनादेश
पुरुषोत्तम कुडवे : ९३७०४६४८२४
दिग्रस :
येथील बड ग्रुप (बैचलर यूनियन ऑफ दिग्रस) तर्फे मुख्यमंत्री सहायता निधि ला ७० हजार रुपयांचा धनादेश देणगी रूपात देण्यात आला. यावेळी ग्रुप च्या सदस्याणी तहसीलदार राजेश वजीरे यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द केला आहे.
कोरोनाच्या महाभयंकर महामारीमुळे अख्या जगात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने सर्वसामान्य जनता धास्तावली गेली आहे.
अश्या परिस्थितीत देशाची, जगाची व राज्याची ढासाळलेली आर्थिक स्थिति, बेरोजगार तरुण व असंघटित कामगारांची दयनीय परिस्थिति तसेच गरजु व अठरा विश्वे दारिद्रया ला तोंड देणाऱ्या गरीब लोकांना माणुसकीच्या नात्याने मदत देण्यासाठी कितीतरी हात पुढे येत आहे. याच श्रुंखलेत दिग्रस च्या बड ग्रुप ने आपल्या तर्फे खारीचा वाटा देउ केला आहे. या कठिण समयी आपल्या वर समाजाचे किंबहुना महाराष्ट्राचे देणे लागतो या सकारात्मक वृत्तिने पुढे येऊन बड ग्रुप च्या सदस्यानी तब्बल ७० हजार रुपये गोळा करत हा निधी तहसीलदार राजेश वजीरे यांच्याकडे धनादेश स्वरुपात सुपुर्द केला.या वेळी बड ग्रुप तर्फे प्रनिष दुधे, विशाल देशमुख,मोहम्मद खलील, निखिल महिन्द्रे गजानन ठाकरे, विशाल ढोले, जुबेर खान इत्यादी उपस्थित होते. या सेवाभावी कार्या मुळे बड ग्रुप चे प्रत्येक स्तरावर कौतुक होत आहे. मुख्यमंत्री सहायता निधि साठी ग्रुप च्या देणगी दात्यामध्ये विनोद आड़े, इमरान गळाकाटू, अमित गुल्हाने, मिलिंद देशमुख, अश्विन उत्तरवार, शक्ति जाधव, राजू देवकर, कुणाल निचत,अमोल दातिर,धीरज जाजड़ा,विनायक गादेवार, गजानन ठाकरे,विशाल देशमुख, मोहम्मद खलील, विशाल ढोले, बंडू देशमुख, अभिजीत तायड़े, नीलेश तायड़े,अर्चना तुपसुन्दरे,प्रीति दुधे, विशाल यमजनवार,अश्विन सवने, राजू ठेंगे, श्वेता दातिर, अतुल निरपासे, अर्जुन हांडे, तुषार शिंदे,प्रशांत चव्हाण,नितिन नीले, दीपाली तायड़े, प्रनिश दुधे इत्यादीचा समावेश आहे।