अधर पुस प्रकल्पातून २.५० दलघमी पाणी सुटणार
शैलेश कोपरकर व राजू राठोड यांच्या मागणीला यश ; पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार
रियाज पारेख :९६३७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पुस नदी पात्राची पाणी पातळी कमी झाल्याने नदी पात्र कोरडे ठणठण पडले आहे. त्यामुळे पुस नदी तीरावरील गावात नागरिकांना पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला .तर शेतकऱ्यांच्या मुक्या जनावराना पिण्यासाठी मुबलक पाणी नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.असे असताना आता पाणी टंचाई निवारणार्थ अधरपुस प्रकल्पातून पुस नदी पात्रात २.५० दलघमी पाणी उद्या रविवारी दुपारी २ वाजता सोडण्यात येणार आहे.पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एका पत्राद्वारे तालुका पाटबंधारे विभागाला आदेशित करून पाणी सोडण्याबाबत आदेश दिले आहेत.
पुस नदी पात्रात अधर पुस प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार असल्याने पुस नदी तीरावरील वाकोडी, उटी, मोरथ, कलगावं, करांजखेड, वाघ नाथ ,आदी गावांना याचा लाभ होणार आहे.
**********************************
उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर व नगरसेवक राजू राठोड यांच्या मागणीला यश
पुस नदी पात्रात पाणी सोडण्यास संदर्भात नुकतेच नगर पंचायत चे उपनगरध्यक्ष शैलेश कोपरकर व
नगरसेवक चरण उर्फ राजू राठोड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी केली होती.त्यांनी केलेली मागणी आता पूर्णत्वास गेली असून त्यांच्या या मागणीला यश आले आहे.