खराब हवामानमुळं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, पुन्हा मुंबईत लँडिग ; आता शिंदेंचा रस्ते मार्गाने प्रवास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खराब हवामानमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी जात होते. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर दरे या गावी उतरवणे शक्य झाले नाही.
त्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत राजभवन येथे लँडिंग करण्यात आले. आता एकनाथ शिंदे रस्ते मार्गाने आपल्या गावी जाणार असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे. एकनाथ शिंदे तीन दिवस आपल्या गावी जाणार आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे हे दरे गावात मुक्काम करणार असून या भागातील काही शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वता बांबू लागवड करतील. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या या हवाई दौऱ्यात अडथळा आल्यामुळे ते रस्ते मार्गाने प्रवास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या आधीही अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर जळगाव विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. धुळ्यात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरद्वारे जात होते. दरम्यान, धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे सावट आल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला आणि त्यांचे हेलिकॉप्टर जळगावला उतरविण्यात आले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….