‘नरेंद्र मोदींनी 100 वेळा पंतप्रधान व्हावं…’, अधीर रंजन चौधरी असं का म्हणाले…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आज चर्चेच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
मणिपूरचा उल्लेख करत ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी 100 वेळा पंतप्रधान व्हावं, आम्हाला काहीही देणं-घेणं नाही.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना अधीर रंजन म्हणतात की, देशाचा प्रमुख असल्याने PM मोदींनी मणिपूरच्या जनतेबद्दल बोलायला हवं. ही मागणी चुकीची नाही, ही सर्वसामान्यांची मागणी आहे. नरेंद्र मोदींनी 100 वेळा देशाचा पंतप्रधान व्हावं, आम्हाला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. आम्हाला देशातील जनतेशी देणं घेणं आहे.
अविश्वास प्रस्तावाची ताकद बघा, आम्ही पंतप्रधान मोदींना खेचून सभागृहात आणलं. ही संसदीय परंपरेची ताकद आहे. मणिपूरवरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहभागी व्हावं, अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी सभागृहात न येण्याची जणू काय शपतच घेतली आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आमचा विचार आधी नव्हता, पण हा आणावा लागला. कारण, जिथे राजा आंधळा आहे, तिथे द्रौपदीचे वस्त्रहरण होणारचं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….