खासदार श्रीकांत शिंदेंनी संसदेत केलं हनुमान चालिसाचं पठण ; विरोधकांना उत्तर ; व्हिडीओ वायरल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कल्याण येथील खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आज संसदेत थेट हनुमान चालिसाचे पठण केले आहे. विरोधकांनी अविश्वासाचा प्रस्ताव मांडल्यानंतर ते महाराष्ट्रातील सत्ताकारणावर बोलत होते.

यावेळी त्यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित केला आणि मला हनुमान चालिसा पाठ असल्याचं सांगत थेट पठणाला सुरूवात केली.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे सभागृहात बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपसोबत निवडून आली आणि काँग्रेससोबत युती केली. त्यांनी १३ कोटी लोकांसोबत गद्दारी केली, हे आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी परत भाजपसोबत सरकार स्थापन केलं.”
“महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हनुमान चालिसा पठण करण्यासाठीसुद्धा परवानगी दिली जात नव्हती.” असं ते बोलत असताना विरोधकांच्या बाकावर बसलेल्या कुणीतरी आवाज केला आणि शिंदे यांनी, ‘मला हनुमान चालिसा पूर्ण येते’ असं म्हणत हनुमान चालिसा पठणाला सुरूवात केली.
दरम्यान, इंडिया आघाडीने मणिपूर प्रश्नावर बोलण्यासाठी आणि सरकारला घेरण्यासाठी संसदीय अधिवेशनामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला. लोकसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्विकारल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरूवात केली. तर भाजपच्या नेत्यांनीसुद्धा काँग्रेसला चांगलं प्रत्युत्तर दिलं.
मणिपूर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलं आहे असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. “मोदी सत्तेत आल्यानंतरच मणिपूरचा चांगला विकास झाला आहे. काँग्रेसच्या काळात कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही” असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत बोलताना केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..