“मोदी सत्तेत आल्यापासून मणिपूरचा विकास, काँग्रेसचं नव्हतं लक्ष”; अविश्वास प्रस्तावावर श्रीकांत शिंदे बरसले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली.
आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
श्रीकांत शिंदे म्हणाले, विरोधकांना यूपीएची लाज वाटते कारण त्यांना फक्त घोटाळे आठवतात. म्हणून त्यांनी इंडिया हे आघाडीचं नाव ठेवलं. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला होता. इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, अशी इंडियाती स्थिती आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सुची A टू Z वाचली तरी कमी पडेल.
मणिपूरच्या मुद्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, मणिपूरमध्ये जे होत आहे. तो चिंतेचा विषय आहे. यावर गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील सर्व जनता एनडीए सोबत आहे. काँग्रेसच्या काळात मणिपूरकडे लक्ष दिले गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मणिपूरचा विकास सुरू झाला.
काँग्रेसच्या सत्ताकाळात मुंबई, पुणे, मालेगाव, हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. तेव्हा कोण गप्प होते, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला केला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर देखील हल्लाबोल केला. मविआ सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात केंद्राचे अनेक प्रकल्प रोखले गेले होते. कोरोना काळात तेव्हाचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते. अडीच वर्षाच अडीच दिवस मंत्रालयात जाऊन उद्धव ठाकरेंनी नवीन रेकॉर्ड केला, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
खुर्चीसाठी ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..