भाजपसह सर्वांसाठी दरवाजे उघडे, पण..; प्रकाश आंबेडकर स्पष्टचं बोलले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील होणार अशा चर्चा होत्या. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. मात्र चर्चा पुढे जावू शकल्या नाहीत.
आज प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी बाबत आणि युतीबाबत विचारले असता, त्यांनी सर्वांसाठी आपले दरवाजे उघडले असल्याचं म्हटलं.
प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत आपले दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं म्हटलं होतं. फ्रेंडशिप डेसाठी दरवाजे मोकळे आहेत. मग राजकीय असो वा व्यक्तीगत असो. दरम्यान भाजप तुमच्या दारात आलं तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे असेल का, त्यावर आंबेडकर म्हणाले की, त्यांना चहापानासाठी दरवाजे उघडे आहेच. पण राजकीय नाही. हे मी आधीच स्पष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीसोबत आपली चर्चा सुरू आहे, त्यावर आंबेडकर म्हणाले की, ते तुम्ही उद्धव ठाकरेंना, सोनिया गांधींना आणि शरद पवारांना विचारा. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. जयंत पाटील-अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चेवर आंबेडकर म्हणाले की, बॉम्ब फुटायचे होते, ते फुटले. हे मी आधीच सांगितलं होतं.
दरम्यान सतीप्रथा औरंगजेबाने बंद केल्याचा दावा ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केला होता. त्यावर नेमाडे म्हणाले की, यावर इतिहासकारांना विचारा. नेमाडे हे गाजलेलं व्यक्तिमत्व आहे. ज्यांचा ज्यांचा जसा अभ्यास आहे तसा त्यांना इतिहास कळतो.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..