भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा ; थेट अंगावर गेले धावून, नेमकं कारण काय…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते आपसात भिडले.
दोन नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ समोर आला आहे.
विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले. याबाबतचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
खरं तर, आज जिल्हा अधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाच्या आमदाराने केला. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. यानंतर काही वेळाने दोन्ही नेत्यांमधील वाद थांबल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदाराला निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही.”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..