अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान, धास्तावलेल्या दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची धास्ती घेऊन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पुन्हा डोके वर काढले. मारेगाव तालुक्यात गदाजी बोरी व म्हैसदोडका येथे दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.
यातील एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर आहे.
गदाजी बोरी येथील अल्पभूधारक शेतकरी महादेव भाऊराव बेंडे (४८) यांनी रविवारी रात्री विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. बेंडे यांची वर्धा नदीलगत शेती आहे. पावसाने नदीला पूर येवून शिवार पूर्णतः खरडून गेले. कर्ज काढून शेती उभारली, मात्र हातचे पीक उध्वस्त झाल्याने ते चिंतेत होते. त्याच चिंतेत त्यांनी विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई , पत्नी व एक मुलगा व एक मुलगी आहे.
दुसऱ्या घटनेत दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील म्हैसदोडका येथील युवा शेतकरी शुभम भाऊराव हेपट (२२) याने स्वतःच्या शेतात विष प्राशन केले. लगतच्याशेतातील शेतकऱ्यास ही बाब निदर्शनास येताच त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यास पुढील उपचारार्थ वणी येथे दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..