राष्ट्रीय कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अजीम खान अमीर खान यांची निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- कामगाराच्या न्याय हक्कासाठी झटणारे, गोर-गरिबांची मदत करणारे, अन्यायाविरुद्ध लढा देणारे, आपल्या वाणीतून आपलंस करणारे सामाजिक क्षेत्रांत ज्यांचे नाव आवर्जून मुखात येणारे दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते अजीम खान अमीर खान यांची राष्ट्रीय कामगार संघटनेच्या नाका कामगार यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.
अज़ीम खान हे मागील २० वर्षोंपासून सामाजिक क्षेत्रांत कार्य करून आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी शेकडो मजूर , सफाई कामगार, मदतगार, चालक यांची बेरोजगारी संस्था स्थापन करून त्यांना कामे कसे मिळतील व ते कसे द्यायचे याबाबत रीतसर अनुभव असणारे अज़ीम खान हे करीत आहे. राष्ट्रीय कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने यवतमाळ जिल्हातील हजारो कामगारांना मिळवून देण्याचे महत्वाचे काम करणार असल्याचे सांगण्यात आले.संपूर्ण जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी कामगारांची मोठी फळी उभी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अज़ीम खान मागील २० वर्षापासून वेगवेगळ्या संस्थामध्ये पदाधिकारी राहिलेले आहे. रानी लक्ष्मीबाई दुर्बल घटक, महिला मंडळ, जीवन सांस्कृतिक मंडळ यांचे ते अध्यक्ष आहेत. डॉ.ए पी जे अब्दुल कलाम फोरम सामाजिक संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्याचेही निरंतर कार्य करीत आहे. याबीबीचा आढावा घेत राष्ट्रीय कामगार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगांवकर यांनी अजीम खान अमीर खान यांची निवड नियुक्ती पत्राद्वारे केली.
दिग्रस येथील अजीम खान अमीर खान सामाजिक, सांस्कृतिक ,पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत आहेत. राष्ट्रीय कामगार संघटनेच्या नाका कामगार यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याने बुद्धीकौशल्य व लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून जनसेवा, जनहित, राज्य व राष्ट्रहित जोपासून लोकशाही दृढ, निकोप संवर्धन व संघटनेचे नाव नक्की उज्वल करील अशी मत अजीम खान अमीर खान यांनी व्यक्त केले. अजीम खान यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..