कोरोनामुळे प्रतिबंधित इंदिरानगर, पवारपुरा भागात सब्जीभाजी, दूध वितरण
राशन,भाजीवितरणासाठी नगरसेवक जावेद अन्सारी यांचा पुढाकार
यवतमाळ दिनांक 29 – कोरोंना संसर्ग मुळे यवतमाळ शहरातिल इंदिरा नगर सह अनेक भाग पूर्णतः सील आहे,त्यामुळे येथील गरीब कुटुंबाना दैनदिन साठी सब्जी भाजी,किराना दूध मिळत नसल्याने परिसराचे नगरसेवक व जिल्हा कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष जावेद अन्सारी यांनी पुढाकार घेतला.त्यांच्यावतीने 29 एप्रिल रोजी इंदिरानगर,पवारपुरा परिसरात शेकडो सब्जी भाजी किट वितरित करण्यात आली.प्रतिबंधित क्षेत्र असल्याने येथील कुटुंबांची दैनंदिन गरजा व व्यथा जाणून या भाजी किट वितरणासाठी नगरसेवक अंसारी यांनी आर्थिक सहाय्य केले. या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते,शाहीन बाग,रिलीफ कमिटी कार्यकर्त्यांनी सब्जी भाजी किट पैकिंग व नगरपरिषद कर्मचारी,अधिकारी,पोलिस कर्मचारी,अधिकारिंनी प्रतिबन्धित भागात किट वितरणासाठी परीश्रम घेतले.
या भाजी किट मध्ये एक आठवडा पुरेल इतके कांदे, आलू,टमाटर,वांगे,भेंडी,चवलाई फल्ली चा समावेश होता.मागील 15 दिवसांपासून या भागात संचार पूर्णतः बन्द आहे.त्यामुळे या परिसरात सतत कोरोना वायरस कन्ट्रोल करण्यासाठी पोलिस बन्दोबस्त लागला असून लोकांची दैनंदिन गरजा पूर्ण करने गरजेचे आहे.या दरम्यानअहोरात्र सेवा देत असलेल्या एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांच्या हस्ते अनेक गरजू कुटुंबाना भाजी किट व रोज़ेदार कुटुंबाना पेंड़खजुर वाटप करण्यात आली.तर शाहीनबाग रिलीफ कमिटीच्या वतीने इंदिरा नगर,पवारपुरा भागात 500 भोजन किट वितरित करण्यात आली.भाजी किट वितरनसाठी नगरसेवक जावेद अन्सारी यांनी आर्थिक सहाय्य करून किराना सामान,भाजी ची व्यवस्था केली.भाजी किट पैकिंग करिता शाहीनबाग रिलीफ कमिटीच्या वतीने शकील अहमद,मुश्ताक गौरी, मुज्जु शेख,अदीब रहमान,शाकिर अहमद,मकसूद अली,निज़ाम काजी, अशरफ भाई,राशिद गौरी,एहतेशाम अहमद,इमरान अहमद,इब्राहिम गौरी ,नोमान अहमद,यांच्यासह अनेक लोकांनी सहकार्य केले तर प्रतिबंधित भागात नगर परिषद सी.ओ.नंदा,एसडीपीओ माधुरी बाविस्कर,नप.आरोग्य अधिकारी डॉ विजय अग्रवाल,नप.लेखापाल अजय गहरवार,पोलिस कर्मचारी अंसार बेग,रूपेश पाली व अन्य लोकांनी शिस्तबद्धपने वितरनसाठी मदद केली.
या सोबतच रोजी आमदार डॉ वजाहत मिर्ज़ा यांच्या वतीने इंदिरा नगर व लगतच्या प्रतिबंधित भागात लॉक डाऊन पर्यंत प्रत्येक दिवशी दूध पैकेट वितरण सुरु करण्यात आले. या भागात 29 व 30 एप्रिल रोजी त्यांच्यावतीने शेकडो कुटुंबाना दूध पैकेट वितरित झाले,या कामासाठी त्यांना सामाजिक कार्यकर्ते मदत करीत आहे.कोरोना वायरस प्रार्दुभावग्रस्त या भागात गोर गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची मदत देण्यात येत असल्याने प्रशासनानेही आभार मानले असून नागरिकांनी लॉकडाऊनपर्यंत आपल्या घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.