पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार आहे.’ असा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. त्यामुळे नियंत्रण कक्षाने सीताबर्डी पोलिसांना तातडीने कळवले.माहिती ऐकून पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
पोलिसांनी लगेच बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण केले. मात्र, काहीही आढळून आले नाही. कुणीतरी खोळसाळपणा केल्याचे समोर येताच ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. ११२ या क्रमांकावर अज्ञात आरोपीने फोन केला व सीताबर्डी पोलिस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगत फोन कट केला. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली.
तातडीने बीडीडीएस पथकाला बोलविण्यात आले व काही मिनिटांतच संपूर्ण पोलिस ठाणे रिकामे करण्यात आले. पोलिस ठाण्यातील कर्मचारी, लॉकअपमधील आरोपी व अधिकारी सर्व बाहेर आले. बीडीडीएसच्या पथकाने पोलिस ठाणे तसेच आजूबाजूच्या परिसराची सखोल तपासणी केली. मात्र, कुठेही स्फोटक वस्तू किंवा ज्वलनशील पदार्थ आढळले नाही. अज्ञात व्यक्तीने फोन करून खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल बेडवाल यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फोन नेमका कुणी केला, याचा शोध घेण्यात येत असून क्रमांक ट्रेस करण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..