वणी नपचे तीन लाचखोर अधिकारी पकडले ; आरोग्य निरीक्षक जय उंटवाल यांचा ही समावेश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वणी :- वणी नगर परिषदेतील बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणार्या नप आरोग्य निरीक्षकासह तिघांंना लाचलुचपत विरोधी विभागाच्या (एसीबी) अधिकार्यांनी लाच घेताना रंगेहात पकडले.
यवतमाळ रस्त्यावरील गजानन भोजनालय मध्ये मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता एसीबी यवतमाळच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. नप आरोग्य निरीक्षक जय उंटवाल, पाणीपुरवठा अभियंता शुभम तायडे व कंत्राटी अभियंता मयूर मुंडाने अशी अटक करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावे आहेत.
वणी नगर परिषदेत काम करणार्या कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठी आरोग्य निरीक्षक जय उंटवाल हा सतत पैशांची मागणी करीत होता. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी यवतमाळ एसीबीकडे तक्रार केली. मंगळवारी तक्रारदाराने उंटवाल याला फोन करून पैसे देतो, अशी बतावणी केल्यानंतर त्याने, मी जेवण करायला गजानन भोजनालयमध्ये जात आहे. तुम्ही पैसे घेऊन तिथेच या असे सांगितले. तक्रारदाराने लगेच एसीबीचे पोलिस निरीक्षकांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशामध्ये भोजनालय परिसरात सापळा रचला. दुपारी 2.30 दरम्यान तक्रारदाराने भोजनालयामध्ये जाऊन आरोग्य निरीक्षक उंटवाल यास लाचेची रक्कम दिली. त्यावेळी नप पाणीपुरवठा अभियंता शुभम तायडे व कंत्राटी अभियंता मयूर मुंडानेसुद्धा तिथे हजर होते.
तक्रारदाराने इशारा करताच भोजनालयाजवळ उभ्या असलेल्या एसीबी अधिकार्यांनी तिसर्या मजल्यावर येऊन धाड टाकली. परंतु धाड पडल्याचे लक्षात येताच आरोपी जय उंटवाल याने भोजनालयाच्या स्वच्छतागृहात पैसे लपवून ठेवले. एसीबी अधिकार्यांनी आरोपीला विचारपूस करून ही लाचेची रक्कम जप्त केली. एसीबी अधिकार्यांनी वणी नगर परिषदेचा आरोग्य निरीक्षक जय उंटवाल, अभियंता शुभम तायडे व कंत्राटी अभियंता मयूर मुंडाने यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सोबत नेल्याची माहिती आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..