पुलावरील कठडे वाहून गेल्याने पुष्पावंती नदीवरील पूल झाला धोकादायक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम :- दिनांक 21 जुलै च्या महाभयंकर ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुष्पावंती नदीला महापूर आला त्यामुळे हिवरा आनंतवाडीला जोडणाऱ्या पुष्पावंती नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे वाहून गेल्याने पुल क्षतिग्रस्त होऊन पुन्हा एकदा धोकादायक झाला आहे. हिवरा व आनंतवाडी ला जोडणारा पुष्पावंती नदीवरील पुल परिसरातील लोकांसाठी दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या पुलावरून हिवरा येथे दहा ते वीस गावातील लोकांचा रोज संपर्क असतो. परिसरातील सर्वात मोठी शाळा हिवरा येथे असल्याने आजूबाजूच्या गावातील अनंतवाडी थार कवठा कासारबेहळ या वं परिसरातील अनेक गावातील शेकडो विद्यार्थी रोज या पुलावरून ये जा करतात. दैनंदिन कामासाठी व नदीपलीकडे असलेल्या शेतीच्या कामासाठी हिवरा येथील शेतकरी शेतमजूर पादचारी सुद्धा याच पुलावरून येजा करत असतात. 2016 सालीआलेल्या पुरामुळे या पुलावरील संरक्षक कठडे याच प्रकारे वाहून गेले होते. संरक्षक कठडे नसल्यामुळे या पुलावरून अनेक लोकांची व जनावरांची सुद्धा पुलावरून पडून जीवित हानी झाली होती तर अनेक अपघातांची मालिकाच चालू झाली होती. त्याचप्रकारे पुलावर गड्डे सुद्धा पडले असून यामुळे दळणवळणासाठी धोकादायक झालेल्या या पुलावरून आता जीव मुठीत घेऊन लोकांना जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी केव्हाही काहीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुन्हा एकदा होणारी मनुष्यहानी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव यांनी या ठिकाणी त्वरित पुलाची दुरुस्ती करून कठडे उभारावे अशी परिसरातील शेतकरी, नागरिक विद्यार्थी मागणी करत आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….