राज्यात ४३ लाख क्विंटलपेक्षा जास्त अन्नधान्याचे वितरण
विदर्भ वतन न्यूज पोर्टल / नागपूर : केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून राज्यातल्या गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात येत आहे. देशातल्या ५२,००० रास्त भाव धान्य दुकानातून अन्न धान्य वितरण करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ४३.५१ लाख क्विंटल अन्न धान्याचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभ मिळणार्या प्रत्येक लाभार्थ्याला प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ५ किलो धान्य, महाराष्ट्रात तांदूळ देण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला १ किलो तूर डाळ किंवा चणा डाळ मोफत पुरवण्यात येत आहे. गरिबांना रोजगार नसल्यामुळे त्यांना या परिस्थितीत मदत करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या १.७२ लाख कोटी पॅकेजचा हा भाग आहे.
लॉकडाउनच्या काळात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात भारतीय अन्न महामंडळ महत्वाची भूमिका बजावत आहे. १३३५ रेल्वे फेर््यातून ३.७४ दशलक्ष मेट्रीक टन अन्न धान्याची वाहतूक महामंडळाने केली. अन्न महामंडळाने पंजाब आणि हरियाणातुन तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली त्याचबरोबर ओडिशा आणि छत्तीसगड मधूनही तांदूळ खरेदी केला असल्याची माहिती शासनाने प्रसार माध्यमांना दिली.
कोविड प्रादुभार्वामुळे महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक धान्य वितरण सेवेच्या कक्षेचा विस्तार करत दहा हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणार्या आणि दारिद्रयरेषेच्या वर असणार्या केशरी शिधापत्रिका धारकानाही धान्य देण्याचा निर्णय घेतला. राज्याने १.५४ लाख मेट्रिक टन अतिरिक्त धान्य साठा केंद्राकडून मागितला आहे.